मध्यम वयात असणार्या आपण सर्व जणी म्हणजेच माझे लेडी डॉट कॉम कुटुंब
आपण गृहीणी आहात का ?आपण उद्योजिका आहात,नोकरी- घर सर्व सांभाळणारी एक कर्तुत्ववान स्त्री आहात का? संसार मुलं नोकरी ह्या सर्व व्यापात आपणास स्वतःकडे पाहण्यास वेळ नाही का ?
अशातच आपले प्रतिबिंब आरशात पाहताना वाईट वाटते, असे आहे का ?
चेहऱ्यावर वांग, टेन, पिग्मेंटेशन डोळ्याखालील वर्तुळे, सुरकुत्या ह्या सर्व आरशात पाहताना दिसत आहेत का ?
हा बदल का?
असे असेल तर “मिशन ब्युटी सुंदर मी होणारच” च्या या ७ जादुई उपाय खास तुमच्यासाठीच.
आपण सर्व प्रदूषणात जगतोय .कामानिमित्त आपल्याला उन्हात बाहेर जावे लागते .आयुष्यात ताण तणाव वाढला आहे आणि हॉर्मोन्स बदल हेसुद्धा आपल्या आयुष्यात खूप मूड चेंज घडवून आणत आहेत .शांत झोप येत नाही ही सर्व कारणं तुमची माझी कथा सांगतात, हो ना!!!
मी डॉक्टर स्मिता चाकोते आपणास ७ जादुई उपाय सांगणार आहे जेणेकरून आपण सदैव आपले तारुण्य टिकवून ठेवणार आहात, चिरतरूण दिसणार आहात.
मी स्वतः गेल्या 13 वर्षापासून ह्या कृती करत आहे आणि त्याने माझ्यासाठी चमत्कार केले आहेत. मी स्वतः याचा जीवंत उदाहरण आहे . मी आपणास वचन देते की आपल्या त्वचेतच नाही तर शरीर आरोग्यवान होईल व आत्मविश्वास वाढेल आपले कौटुंबिक संबंध आनंदी होतील आणि हो आपली प्रशंसा होईल म्हणून मी आपणास आव्हान करते
7 जादुई उपाय नक्कीच तुम्ही करून पहा.
1. दररोज एका ठराविक वेळेस जागे व्हा
कृतज्ञतेने फक्त म्हणा धन्यवाद, मी श्वास घेत आहे
धन्यवाद, मी निरोगी आणि सुंदर आहे.
2. ब्रिस्क वॉक 30 मिनिट

व्यायामामुळे रक्ताभिसरण होते , त्वचा सुधारते.
व्यायामामुळे ऑक्सिजनची पातळी सुधारते, त्वचा निरोगी दिसते.आणि महत्वाचे म्हणजे व्यायामामुळे चांगले हार्मोन्स रिलीज होतात.
3. ध्यान आणि कल्पना यांचा सुंदर मिलाप अनुभवा.

ध्यान करा डोळे मिटा आणि कल्पना करा की पांढरा प्रकाश आपल्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत परिपूर्णतेने भरत आहे आणि आपली त्वचा सतेज दिसत आहे.
4.आरशात आपले प्रतिबिंब पहा आणि म्हणा

माझी त्वचा सतेज आहे.
मी खूप सुंदर आहे.
मी निरोगी आहे.
5. दररोज सकाळी 2 ग्लास कोमट पाणी प्या

पाणी पिताना त्या सृष्टीकरत्याला धन्यवाद द्या ,पाणी सृष्टीतील सर्वात सुंदर पेय आहे जे आद्रता देते.
6. जेवण नियमित आणि वेळेवर घ्या. आहारात सर्व पालेभाज्या उसळी नियमित घ्या.

प्रथिने आणि व्हिटॅमिन C समृध्द अन्न घ्या.
7. लवकर झोपा. दररोज एका निश्चित वेळेवर झोपा. झोपण्याच्या 15 मिनिटा आधी मोबाइल, टीव्ही बंद करा.

निळा प्रकाश मेलाटोनिन कमी करतो. आपण झोपेच्या संप्रेरकांना कमी करतो. सुंदर त्वचेसाठी शांत झोप फार गरजेची आहे
मी आपणास सांगितलेल्या या ७ अमेझिंग, जादुई उपाय आपणास समजल्या असतीलच.
आपण ७ दिवस, ह्या ७ जादुई उपाय केल्यास आपणास “सुंदर मी होणारच” म्हणजेच सुंदर होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आपण आपल्या सुंदर सतेज चेहऱ्याच्या प्रेमात नक्कीच पडाल .
मी डॉक्टर स्मिता चाकोते, आपलीच सौंदर्य व त्वचारोग तज्ञ. Expert For Ageless Beauty
माझा संकल्प आहे की ,पुढील तीन वर्षात मला 1 लाख मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर , चिरतरुण बनवायचे आहे.
आपणास वरील ब्लॉग आवडल्यास नक्कीच आपण व आपले आप्त व मैत्रिणी खाली दिलेल्या फेसबुक लिंक वर क्लिक करून या मिशन चा एक भाग होऊ शकता.
चला तर मग या लिंक वर क्लिक करा आणि
Mission Beauty सुंदर मी होणारच, या आपल्या समुदायात सहभागी व्हा.
खुप सुंदर माहिती
सुंदर मी होणार.