सुंदर मी होणारच–
ध्यान आणि आणि सतेज सुंदर त्वचा चेहरा आणि त्वचा न बोलता खूप काही बोलून जाते प्रेमात त्वचा गुलाबी दिसते आणि घाबरल्या वर त्वचा पांढरी दिसते
आजच्या जगात आपण खूप स्ट्रेस मध्ये आहोत आणि म्हणूनच सायको डर्मेटोलॉजि ही सायन्स ची ब्रांच आता अभ्यासात आली आहे
मन आणि त्वचा भावना आणि आरोग्य ह्याला महत्व प्राप्त झाले आहे
स्ट्रेस मुळे मुरूम एक्झिमा सोरियासिस लू कोडर्मा हे त्वचेचे आजार जास्त होतात
एका स्टडी मध्ये सोरियासिस पेशंटना अल्ट्रावायलेट लाईट देण्यात आले व काही पेशंट ना अल्ट्रावायलेट लाईट व ध्यान करण्यास लाभले ज्या पेशंट मी ध्यान केले त्यांना चार पटीने जास्त रिझल्ट आले
ध्यान आणि वृद्धत्व
ध्यान करणारी व्यक्ती ही मनाने शांत असते आणि त्यामुळे त्यांचे श्वास एका गतीत असते त्यामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळते शांत मन असल्याकारणाने मन प्रसन्न आनंदी राहते व सिरोटोनिन नामक हार्मोन जास्त असते आणि आत्मविश्वास दिसून येतो
स्ट्रेस मध्ये कॉर्तीसोल , एड्री नालीन नावाचा हार्मोन वाढतो त्यामुळे रक्त वाहिन्या घट्ट होतात ब्लड प्रेशर वाढते आणि सहाजिकच ऑक्सिजन पुरवठा कमी होतो
मन ध्याना द्वारे शांत ठेवल्याने आपली त्वचा उजळून सतेज दिसते केवळ पाच मिनिट ध्यान केले तरी एक महिन्यात आपल्याला त्वचेत फरक जाणवेल
सकाळी रोज किमान पाच मिनिट शांत डोळे झाकून मन शांत करून बसा प्रत्येक श्वास घेताना श्वासाकडे लक्ष केंद्रित करा जमत असेल तर दुपारी आणि रात्री झोपण्या पूर्वी परत करा एक महिना केल्यानंतर आपला अनुभव आम्हाला सांगा
ध्यान आणि सतेज सुंदर चेहरा