admin ajax 38 min

सात चांगल्या सवयी ज्यामुळे तुमची स्वप्ने सत्यात उतरतील.

१) तुम्ही वयाची तीस वर्षे पूर्ण केलेल्या महिला आहात का?

2)तुमच्या जीवनात नैराश्य  आले आहे का?

3) तुम्ही हुशार असून देखील तुमची  स्वप्न अपूर्ण राहिली आहेत का?

4) तुम्ही खूप व्यस्त जीवन जगत आहात का?

जर वरील सर्व प्रश्नाची उत्तरे होय असतील, तर जाणून घ्या तुमच्या स्वप्नाच्या वाटेमध्ये झारीतील कोणता शुक्राचार्य येत आहे? कदाचित तुमचे प्रश्न खालील प्रमाणे असतील.

7 705x1024 min

१) तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी दिवस रात्र राबता  आहात का ?

२) तुम्ही स्वतः व्यवसाय किंवा नोकरी करून घर सांभाळता आहात का?

३) वयाची तिशी पार केल्यामुळे हौस मौज करायचे वय संपले असे तुम्हाला वाटते आहे  का?

४) वेळ व इच्छा असून सुद्धा, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचा कंटाळा आला आहे का?

वरील सर्व प्रश्नांची उत्तर  एकच आहे ते म्हणजे तुम्हाला वेळेचे नियोजन करता येत नाही. आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वांना इंस्टंट रिझल्ट हवा असतो, म्हणजेच चुटकीसरशी खाद्य, गाडी, घर आणि उत्पन्न हवे असते , पण ते शक्य आहे का ? यासाठी काय करावे लागेल, त्यासाठी एक  उदाहरण देते , आपण एखादी बिल्डींग बांधताना बघतो.  सुरुवातीला सभोवताली एक कंपाउंड असते , दोन महिने , चार महिने तिकडे काहीच हालचाल दिसत नाही पण सहा महिन्यांनी मात्र पहिला मजला दिसायला लागतो आणि एक वर्षात तिथे एक मोठा टॉवर उभा राहतो. प्रत्येकाला  नवल वाटते अरे एक वर्षापूर्वी इथे काहीच नव्हते‌.  अशाच प्रकारे  अर्जुनाला जसा   वेध घेण्यासाठी  फक्त पक्षाच्या डोळा दिसत होता , त्याप्रमाणे  तुमच्याकडे जर सातत्य असेल ध्येय गाठू शकता.

घाबरू नका मैत्रिणींनो मी या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे देणार आहे.

मी डॉक्टर स्मिता चाकोते , माझे मिशन आहे सुंदर मी होणारच . मी व्यवसायाने त्वचारोग तज्ञ असून, एका कॉलेजमध्ये  प्राध्यापक म्हणून क्लासेस घेत आहे मला चांगला पगार आहे, माझी प्रॅक्टिस चांगली चालली आहे मग मी उगाच कशाला धडपड करू, त्याच बरोबर मी एक आदर्श गृहिणी आहे, माझ्या ऐंशी वर्षांच्या आई चा सांभाळ  व  तारुण्या मध्ये  पदार्पण करणारी माझी मुलगी यांच्यावर मी संस्कार देखील करते  आहे. त्याचबरोबर माझा स्टाफ यांच्यावर देखील मला देखरेख करावी लागते.

आता तुम्ही म्हणाल या मॅडम जर एवढ्या बिझी असतात तर त्या खूप तरुण असतील तर त्याचे उत्तर नाही, असे आहे.  मी  जरी वयाची ५० वर्ष पूर्ण केली  असली तरी  तरूणीला लाजवेल असे माझे कर्तृत्व आहे.

admin ajax 35 min

मग तुम्ही म्हणाल मी हे सर्व का करते  आहे ? माझे ध्येय आहे  एका वर्षात एक लाख  स्त्रियांना मी सुंदर बनवणार आहे सुंदर दिसल्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो , त्यामुळे तुम्ही यशस्वी होता,व यशस्वी झाल्यामुळे तुम्ही आनंदी राहता. , या कोरोना सारख्या परिस्थितीत ही गोष्ट सहज साध्य आहे का? 

मरण्यापूर्वी एक लाख स्त्रिया सुंदर झाल्या पाहून माझ्या मनाला किती आनंद होईल याची मी कल्पना करू लागले यालाच म्हणतात चक्रवाढ परिणाम म्हणजेच कंपाउंड इफेक्ट. यामध्ये तुम्हाला लगेच रिझल्ट मिळत नाही रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते, तुम्ही रोज  क्रिएटिव्ह राहता त्या मुळे एक पाऊल पुढे टाकता, व इतरांवर मात करता , ज्यावेळी  जग झोपलेले असते, त्यावेळी तुम्ही काम करता आणि त्याचे तुम्हाला योग्य फळ मिळणारच, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी तुम्हाला खालील गुरुमंत्र देते  आहे .त्याचा तुम्ही अवलंब केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायात  नक्कीच यशस्वी होऊ शकता व तुमचा ब्रँड निर्माण करु शकता.

आता जाणून घेऊया सात रहस्य ज्यामुळे मी माझी स्वप्न पूर्ण करू शकले.

4 1024x616 min

१) सकाळी चार ते साडेचार वाजता उठून   मेडिटेशन करणे ,व्यायाम करणे व ऑडिओ  ऐकणे. मॉर्निंग वॉक करताना ग्रॅटिटूड  ऑडिओ ऐकणं व इतरांना ऐकण्यासाठी प्रेरित करणे.

कृतज्ञता व्यकत करणे सकाळी उठल्यावर त्या भगवंताला धन्यवाद सांगते कारण आजचा एक पूर्ण सुरेख दिवस मला भेट म्हणून मिळालेला आहे सर्वात मुख्य मी जिवंत आहे मी आरोग्यवान आहे अशा पद्धतीने माझ्या दिवसाचे सुरुवात होते.

मेडिटेशन ध्यान किमान अर्धा तास नामस्मरण जप नित्यसेवा अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन ह्यामुळे प्रचंड सात्विक भाव निर्माण होतात आणि ऊर्जा मिळते

अफरमेशन म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य स्वतःला म्हणायचे आहेत जसे मी आरोग्यवान आहे मी सुंदर आहे मी आनंदी आहे मी आयुष्य खूप सुंदर रित्या जगत आहे मला खूप चांगले लोक भेटतात मी आयुष्यात यशस्वी आहे

ब्रिस्क वॉक केल्याने हार्ट रेट वाढतो रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे शरीर आरोग्यवान होते बुद्धी क्क्रियेटिव व सक्षम रित्या काम करते

ऑडिओ बुक रोज दहा मिनिट ऐकणे व स्वतःचा अनुभव व त्यातली शिकवण याची जोड करून मी अनेक ऑडिओ बनवले आहेत जे मी वन नोट मध्ये स्टोर करून ठेवत आहे

5 1024x537 min

२) माझे आवडते कार्य म्हणजे लिखाण काम .

मला लिहायला आवडते आणि म्हणूनच मी दोन पुस्तकावर सध्या काम करत आहेत काही वर्षांपूर्वी मी दोन पुस्तके लिहिली होती
1 नो मोअर अबाउट युअर स्किन लूक यंग फोरेवर
2 द आर्ट ऑफ बॉडी स्कलप् टिंंग

मी दोन पुस्तके लिहिते आहे ,एजलेस ब्युटी व माय स्टोरी ऑफ ब्रँडिंग ,

एजलेस ब्युटी ह्या पुस्तकात मी खूप छोट्या टिप्स देेणार आहे जेणेकरून आपल्या हातात तारुण्याची गुरुकिल्ली मिळणार आहे

आपल्याला हि पुस्तके वाचायला आवडतील का ?

द स्टोरी ऑफ माय ब्रँडिंग हे दुसरे पुस्तक आहे मी काही एमबीए नाही मी डॉक्टर आहे मी आजपर्यंत खरच जे करत आले तो माझा ब्रँडिंग फॉर्मुला आहे ते मी या पुस्तकात सादर करत आहे.

यूट्यूब चैनल मी दोन वर्षांपूर्वी चालू केला माझ्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांकरता खूप उपयोगी असणार आहे आणि म्हणून मी चैनल चालू केला आज पर्यंत माझी 109 व्हिडिओ झाले आहेत काही व्हिडिओ पंचवीस हजार एवढे व्हीयुज आहेत

11 640x1024 min

३) ब्लॉग लिहिणे , पाॅडकास्ट बनवणे ,युट्युब वर व्हिडिओ अपलोड करणे,

मी एक महिन्यापासून ब्लॉग लिहिणे पॉडकास्ट बनवणे हे पण शिकत आहे आणि हो माझ्या वेबसाईटवर माझे ब्लॉग अपलोड केलेले आहेत आणि माझे व्हिडीओज फेसबुक वर युट्युब वर आणि शॉर्ट व्हिडीओज इन्स्टा वर अपलोड करत आहे.

४) कितीही ही बीजी शेडूल असले तरी दोन तास म्हणजेच थोड्या थोड्या अंतराने स्वतःसाठी वेळ काढणे व आवडीचे वाचन करणे.

रोज वाचन केल्याने आपल्या पर्सनालिटी मध्ये विचारांमध्ये खूप बदल घडतो आणि रोज नवीन शिकत राहण्याने आपण क्रिएटिव राहतो ज्ञानाचा अथांग सागर आपल्यासाठी आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला नको का ?

माझे गुरु नेहमी म्हणायचे रोज ज्ञानात भर पडणे गरजेचे आहे आणि प्रामुख्याने डॉक्टरी पेशात रोज नवीन नवीन औषध ट्रीटमेंट पद्धती ह्या उपलब्ध असतात त्यामुळे नित्य वाचनाची सवय या प्रोफेशन मधून मी अवगत केली आहे.

s 767x1024 min

५) पेशंट बघत असताना मध्ये  जो वेळ मिळतो त्यात आपली ज्ञानसाधना कशी वाढेल याचे  ऑडिओ , व्हिडिओ बघणे.

फावल्या वेळात आपण आपल्या कामाचे सोडून खूप व्हिडिओज व्हाट्सअप पाहतो विचारपूर्वक आपल्याला जो ज्ञान देणार आहे असाच व्हिडिओ आपण रोज पाहत राहिलो तर काय होईल बरे?

fb min

६) दिवसातून एकदा ठरवून आपल्या  तीन मैत्रीणीना  किंवा ग्राहकांना फोन करून त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यांना माझा फेसबुक ग्रुप जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट करणे.

एक डॉक्टर कडून आपल्याला फोन येतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं नक्कीच छान वाटतं आपली आई जेव्हा आपली विचारपूस करते तेव्हा आपल्याला आनंद होतो तसंच आहे कस्टमरला सर्विस सेवा आपण देतो नक्कीच कस्टमर राजा होतो आणि त्याला आपल्याकडे परत यावे असे वाटते.

७) प्रथम मि एक स्त्री आहे.  माझे माझ्यावर प्रेम असले पाहिजे व ते  वाढवण्यासाठी मी माझ्या आवडीची कामे करणे.

स्वतःवर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हाच आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो स्वतःच्या आयुष्यात स्वतःवर प्रेम करा आनंदात रहा स्वतःची काळजी घ्या नियमितपणे सकस आहार घ्यावा छान झोप घ्या गाणी ऐका आपल्या प्रियजना सोबत वेळ घालवा जमत असेल नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात थोडावेळ घालवा आणि पहा तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडालच.

माझ्यासारख्या व्यस्त स्त्रीला जे जमू शकते तर मैत्रिणींनो तुम्हाला का नाही? तुम्हाला उडता येत नसेल तर धावा , धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, पण आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर खालील लिंक वर क्लिक करा व माझा फेसबूक ग्रुप जॉईन करा. धन्यवाद

सात चांगल्या सवयी ज्यामुळे तुमची स्वप्ने सत्यात उतरतील.

Facebook Page Link – https://www.facebook.com/Dr.SmitaChakote

Facebook Group Link – https://www.facebook.com/groups/994946850922196

Youtube Link – https://www.youtube.com/results?search_query=dr+smita+chakote

2 thoughts on “सात चांगल्या सवयी ज्यामुळे तुमची स्वप्ने सत्यात उतरतील.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *